अजनी गावाचा 'वैभव' उजळला! वैभव मेश्राम यांची यूपीएससी परीक्षेत बाजी; इन्कम टॅक्स सुपरिटेंडंट पदी निवड

अजनी गावाचा 'वैभव' उजळला! वैभव मेश्राम यांची यूपीएससी परीक्षेत बाजी; इन्कम टॅक्स सुपरिटेंडंट पदी निवड
नांदगाव खंडेश्वर : 
तालुक्यासाठी आणि विशेषतः अजनी गावासाठी एक अत्यंत अभिमानाची बातमी समोर आली आहे. आपल्या गावचा सुपुत्र वैभव दीपकराव मेश्राम याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशासह वैभवची 'इन्कम टॅक्स सुपरिटेंडंट' (Class 2) पदी नियुक्ती झाली असून, त्याच्या या कामगिरीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
अत्यंत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वैभवने हे यश मिळवून आपल्या कुटुंबासह संपूर्ण गावाची मान अभिमानाने उंचावली आहे. एका ग्रामीण भागातील तरुणाने मेहनतीचे डोंगर पार करून थेट केंद्र सरकारच्या प्रशासकीय सेवेत स्थान मिळवल्याने त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
वैभवच्या या यशाबद्दल त्याचे आणि मेश्राम परिवाराचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीस ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.