बच्चू कडूंची विधान परिषदेवर वर्णी लागणार? धामणगाव रेल्वे मतदारसंघात मोठ्या फेरबदलाची चर्चा; 'या' युवा नेत्याला मिळणार शिंदेंकडून विधानसभेची लॉटरी !

बच्चू कडूंची विधान परिषदेवर वर्णी लागणार? धामणगाव रेल्वे मतदारसंघात मोठ्या फेरबदलाची चर्चा; 'या' युवा नेत्याला मिळणार शिंदेंकडून विधानसभेची लॉटरी !
  अमरावती :  सोनी हिरवे  ( विशेष वृत्त )  राज्याच्या राजकारणात सध्या अनेक खळबळजनक घडामोडी घडत असतानाच, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) कडून विधान परिषदेची 'लॉटरी' लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मतदारसंघाची नवी फेररचना आणि राजकीय गणितं
मिळालेल्या माहितीनुसार, बच्चू कडू यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्यास धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील काही भाग बडनेरा मतदारसंघात जोडला जाण्याची शक्यता आहे. या भौगोलिक बदलासोबतच धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यात राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत.
शिंदे सेनेत कोणाची होणार एन्ट्री ?
या संपूर्ण बदलाच्या पार्श्वभूमीवर, धामणगाव रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर परिसरात मोठा प्रभाव असलेले एक 'दमदार दिग्गज युवा नेते' लवकरच उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. या युवा नेत्याचा जनसंपर्क आणि भागातील पकड पाहता, त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून उमेदवारीची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
कोण आहेत ते युवा नेते ?
सध्या राजकीय वर्तुळात या 'मिस्ट्री मॅन'ची जोरदार चर्चा सुरू आहे. हा युवा नेता कोण? याबाबत नाव अद्याप गुलदस्त्यात असले, तरी त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या नेत्याच्या पक्षप्रवेशामुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे पूर्ण चित्र बदलून नविन मतदार संघाची उमेदवारी युवा नेत्याला मिळण्याची शक्यता राहु शकते नविन मतदार संघात सदर नेता प्रभावी दमदार उमेदवार ठरु शकतो असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. सदर युवानेता पहिली  परिक्षा मोठ्या चाणक्य नितीने पास झाल्यामुळे त्याचा फायदा नक्कीच मिळु शकते असे समजते
बच्चू कडूंची नवी भूमिका आणि या युवा नेत्याचा संभाव्य पक्षप्रवेश यामुळे जिल्ह्यातील राजकारण कोणत्या वळणावर जाते, याकडे संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.