गुणवत्तेच्या आकाशात नांदगाव खंडेश्वरची 'भीमकन्या' धनश्रीची उत्तुंग भरारी; ९१.१७% गुणांसह तालुक्यात प्रथम !
नांदगाव खंडेश्वर :
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर तालुक्यातील स्थानिक नांदगाव खंडेश्वर शहरातील बुद्ध लोकवस्तीत राहणारी अत्यंत गरिब मोलमजुरी करणार्या परिवारातील 'भीमकन्या' कु. धनश्री प्रदिप थोरात हिने यशाचे शिखर सर केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षेच्या निकालात धनश्रीने ९१.१७% गुण मिळवून संपूर्ण तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तिच्या या दैदीप्यमान यशामुळे सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

धनश्रीने मिळवलेले हे यश केवळ तिचे वैयक्तिक यश नसून, तिने आपल्या कुटुंबासह संपूर्ण तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ठरवले तर ते कोणत्याही आव्हानावर मात करून यश मिळवू शकतात, हेच धनश्रीने आपल्या निकालातून सिद्ध करून दाखवले आहे.
तिच्या या यशाबद्दल बोलताना परिसरात आनंदाचे वातावरण असून, "धनश्रीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून हे यश मिळवले आहे, तिचा आम्हाला अभिमान आहे," अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. धनश्रीच्या या यशात तिचे वडील प्रदिप थोरात व कुटुंबातील सदस्यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले आहे.
येणाऱ्या काळातही अशीच प्रगती करत राहावी आणि यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करावीत, यासाठी धनश्रीला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!