नांदगाव खंडेश्वर :
तालुक्यात सध्या कडाक्याचे ऊन आणि वाढत्या तापमानाचा फटका आता शेतमालालाही बसू लागला आहे. आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास लोणी टाकळी येथील फाट्याजवळ कापसाने भरलेल्या एका गाडीने अचानक पेट घेतल्याची खळबळजनक घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी घेऊन जात असताना लोणी टाकळी फाट्याजवळ अचानक गाडीतून धूर निघू लागला आणि पाहता पाहता कापसाने भीषण पेट घेतला. दुपारची वेळ आणि वाऱ्याचा वेग यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. रस्त्यावरील प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा:
सध्या तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे, अशा स्थितीत कापूस सारखा ज्वलनशील माल वाहून नेताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. गाडीत तांत्रिक बिघाड, शॉर्ट सर्किट किंवा घर्षणामुळे ठिणगी पडून अशा घटना घडू शकतात.

- काय काळजी घ्याल ?
१. कापसाची वाहतूक करताना गाडीवर ओले ताडपत्री किंवा जाड कापड झाकून ठेवावे.
२. वाहनाच्या बॅटरी आणि वायरचे कनेक्शन तपासून घ्यावे.
३. गाडीमध्ये शक्य असल्यास पाण्याची सोय किंवा अग्निशमन यंत्र सोबत ठेवावे.
४. विडी-सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावधान राहावे.
आपला वर्षभराचा घाम गाळून पिकवलेला पांढरा सोन्याचा असा नाश होऊ नये, यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी वाहतूक करताना अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.