फुल आमला येथे आंबेडकरी बालसंस्कार वर्गाच्या वतीने 'सहभोजन' संपन्न

फुल आमला येथे आंबेडकरी बालसंस्कार वर्गाच्या वतीने 'सहभोजन' संपन्न

नांदगाव खंडेश्वर -
नांदगाव खंडेश्वर' तालुक्यातीस  मानवता प्रगती' बुद्ध विहार, फुल आमला येथे सुरू असलेल्या आंबेडकरी बालसंस्कार वर्गाच्या वतीने आज, ३ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत 'सहभोजन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमात बालसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. समता, बंधुभाव आणि एकतेची भावना लहान वयातच मुलांच्या मनावर बिंबावी, या उद्देशाने या सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र बसून भोजनाचा आस्वाद घेतला, ज्यामुळे विहाराच्या परिसरात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
आंबेडकरी विचारांची पेरणी करणाऱ्या या बालसंस्कार वर्गाद्वारे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. आजच्या या सहभोजन कार्यक्रमाचे गावकरी आणि पालकांनी विशेष कौतुक केले आहे.