समस्त मतदार बंधु व भगिनींनो, तसेच माझ्या नांदगाव खंडेश्वर शहरातील सुज्ञ नागरिक बंधू-भगिनींनो,
मी सौ. प्रांजली राहुल गुल्हाने, तुमची नगरसेविका, आज आपल्यासमोर एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' करण्यासाठी उभी आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आपल्या नांदगाव खंडेश्वर शहरात 'अडाणी टोटल गॅस लिमिटेड' कंपनीद्वारे गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. विकास कामांना आमचा कधीही विरोध नव्हता आणि असणार नाही. परंतु, विकासाच्या नावाखाली जर माझ्या शहरातील जनतेच्या आरोग्याशी खेळ केला जात असेल, तर मी एक लोकप्रतिनिधी म्हणून गप्प बसणे शक्य नव्हते.
या कंपनीने चांदूर रेल्वे रोड ते अमरावती रोडपर्यंत केलेल्या बेजबाबदार खोदकामामुळे संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते. निष्पाप नागरिकांना, लहान मुलांना आणि वृद्धांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत होता. कामात प्रचंड अनियमितता होती.
माझा लढा आणि पाठपुरावा शहराची ही दुरवस्था पाहून, मी केवळ घरात बसून फेसबुक किंवा व्हाट्सॲपवर पोस्ट टाकल्या नाहीत. मी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम केले. मी पुराव्यानिशी या संपूर्ण प्रकरणाची तक्रार:
१. माननीय मुख्यमंत्री महोदय
२. प्रदूषण नियंत्रण विभाग
३. नगर पंचायत प्रशासन, नांदगाव खंडेश्वर
४. पोलीस स्टेशन आणि तहसीलदार यांच्याकडे दाखल केली.
केवळ तक्रार देऊन मी थांबले नाही, तर हा अन्याय दूर होईपर्यंत सतत आणि वेळोवेळी पाठपुरावा केला.
संधीसाधूंचे राजकारण आणि डमी तक्रारी:
नांदगावकर हो, आता खरा फरक समजून घ्या. जेव्हा माझा पाठपुरावा अंतिम टप्प्यात आला, तेव्हा काही 'संधीसाधूंना' अचानक जाग आली. त्यांनी माझ्या मूळ तक्रारीची 'डमी' (नकल) केली आणि प्रशासनाला फक्त एक कागद नेऊन दिला. त्यानंतर त्यांनी कोणतीही चौकशी केली नाही, ना कधी पाठपुरावा केला. ते फक्त घरात बसून तमाशा पाहत होते.
कारवाई आणि श्रेय लाटण्याचा खोटा प्रयत्न:
माझ्या सततच्या कायदेशीर आणि पुराव्यानिशी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासनाला झुकणे भाग पडले. नगर पंचायत प्रशासनाने या प्रकरणात अडाणी गॅस कंपनीवर दंडात्मक कारवाई करून कठोर आदेश जारी केले आहेत. हा माझ्या नांदगाव खंडेश्वरच्या जनतेचा आणि माझ्या प्रामाणिक लढ्याचा विजय आहे!
पण अत्यंत खेदाची आणि हस्यास्पद गोष्ट म्हणजे, कारवाईचे आदेश निघताच, ज्यांनी फक्त डमी तक्रार केली होती, ते संधीसाधू आता 'फुटकं श्रेय' लाटण्यासाठी पुढे सरसावले आहेत. "काम करायचं एकाने आणि नाव घ्यायचं दुसऱ्याने" हा धंदा आता नांदगाव खंडेश्वरमध्ये चालणार नाही.
माझे आव्हान मी आज या माध्यमातुन त्या संधीसाधूंना जाहीर आव्हान देते, की जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही केलेल्या पाठपुराव्याचे पुरावे जनतेसमोर मांडा. कागदाची कॉपी करणे सोपे असते, पण जनतेसाठी अधिकाऱ्यांच्या दारात चपला झिजवणे आणि न्याय मिळवून देणे यासाठी काळजात धमक लागते !
माझा लढा हा प्रसिद्धीसाठी नव्हता, तर माझ्या शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि हक्कासाठी होता.
प्रशासनाने केलेली दंडात्मक कारवाई हा केवळ एक टप्पा आहे, यापुढेही शहराच्या हितासाठी मी अशीच लढत राहीन.
सत्य काय आहे हे माझ्या नांदगावच्या सुज्ञ जनतेला चांगलंच ठाऊक आहे. खोटं बोलून, श्रेय लाटून फार काळ राजकारण करता येत नाही.पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी या सर्व संधीसाधूंचा बुरखा फाडणार आहे.
तुम्ही सर्वांनी मला नेहमी जे सहकार्य केले, त्याबद्दल मी माय बाप जनतेची सर्वांची आपली सदैव ऋणी राहीन!
जय हिंद, जय महाराष्ट्र!