माझ्या प्रभागात बाहेरील हस्तक्षेप खपवून घेणार नाही!'; श्रेय लाटणाऱ्यांविरोधात नगरसेविका प्रांजली गुल्हाने आक्रमक

'माझ्या प्रभागात बाहेरील हस्तक्षेप खपवून घेणार नाही!'; श्रेय लाटणाऱ्यांविरोधात नगरसेविका प्रांजली गुल्हाने आक्रमक

नांदगाव खंडेश्वर:
स्थानिक नगरपंचायतीमधील प्रभाग क्रमांक १४ च्या अधिकृत नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांच्या प्रभागात इतर लोकप्रतिनिधींकडून राजकीय पोळी भाजण्यासाठी विनाकारण हस्तक्षेप केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुसऱ्या प्रभागातील नगरसेवकांकडून सुरू असलेल्या या ढवळाढवळीविरोधात आणि विकासकामांचे चुकीच्या पद्धतीने 'श्रेय' घेण्याच्या वृत्तीविरोधात नगरसेविका सौ. प्रांजली गुल्हाने यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्या प्रभागातील जनतेच्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी त्या आता कायदेशीर व राजकीय लढा देण्यास सज्ज झाल्या आहेत.
पराभूत आणि अपयशी लोकांचा केविलवाणा प्रयत्न
या संदर्भात तीव्र संताप व्यक्त करताना नगरसेविका सौ. प्रांजली गुल्हाने म्हणाल्या, "माझ्या प्रभागात कोणती विकासकामे मंजूर करून घ्यायची, ही संपूर्ण जबाबदारी माझी आहे. निवडणुकीत जनतेने ज्यांना नाकारले, असे काही अपयशी लोक केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी विनाकारण आव आणत आहेत. नियमानुसार जी कामे मंजूर होणारच आहेत, त्याचे अगाऊ श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे." लोकशाहीत जनतेने निवडून दिलेला हक्काचा लोकप्रतिनिधी असताना, बाहेरील व्यक्तींनी प्रभागात ढवळाढवळ करणे हा जनतेच्या कौलाचा थेट अपमान असल्याची भावना आता प्रभागातील नागरिकांमधूनही व्यक्त होत आहे. 
पक्ष प्रमुख व जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करणार ; 
थेट कायदेशीर कारवाईचा इशारा या राजकीय हस्तक्षेपाची सौ. प्रांजली गुल्हाने यांनी गंभीर दखल घेतली आहे. "प्रशासकीय अधिकाऱ्यांना मी याबाबत कडक सूचना देणार आहे. माझ्या प्रभागात माझ्या मंजुरीशिवाय जर कोणी अनधिकृतपणे हस्तक्षेप करत असेल किंवा निर्णय घेत असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही," असा सज्जड दम त्यांनी दिला आहे. या प्रकरणी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, पक्षाची वरिष्ठ पातळी आणि थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कायदेशीर तक्रार दाखल करण्याची तयारी त्यांनी पूर्ण केली आहे.
"माझ्या प्रभागातील जनतेचा विकास आणि त्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी कुणी बाहेरील पक्षाचे लोक आमच्याशी गोड बोलुन राजकीय डावपेज करुन भविष्याची बांधणी करत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे.
मला हलक्यात घेत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे.
मी काही दुध पित लेकरु नाही केव्हा कुठे काय करायच कळते दुसर्याला कमी लेखुन खोटे श्रेय घेणे माझे रक्तात नाही. 
जर का माझ्या प्रभागात येऊन कोणी ढवळाढवळ करत असेल, तर त्यांचे मनसुबे मी पूर्णपणे हाणून पाडेल."
नगरसेविका पद आज आहे उद्या नाही मायबाप जनतेने मला निवडुन दिले जर जनता म्हणत असेल मी कधीही राजीनामा देतो.मला कमी लेखुन माझ्या अधिकारावर हक्कावर जर कोणी गद्दा आणत असले तर खपऊन घेणार नाही.
 शांत आहे. याचा अर्थ 
  • शांत बसणे म्हणजे अगतिकता नसते.
  • ती एक आंतरिक शक्ती असते.
  • माझ्या शांततेचा चुकीचा अर्थ काढू नका.
  • सिंह शिकारीपूर्वी नेहमी शांतच असतो.
  • मी शांत आहे याचा अर्थ असा नाही,
  • की मला काही समजत नाही.
  • चिखलात फुल कसे उमलवायचे,
  • हे शांत राहूनच शिकता येते.
  • वाद घालण्यापेक्षा शांत राहिलेले बरे.
  • शांतता हाच अतिशहान्या लोकांना मोठा जबाब आहे.
  • तथागत बुद्धांचा हाच खरा विचार आहे. हे विसरता कामा नये
        सौ. प्रांजली राहुल गुल्हाने  
       नगरसेविका, प्रभाग क्र. १४, 
             नांदगाव खंडेश्वर
या प्रकरणाने आता नांदगाव खंडेश्वरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून, आगामी काळात हा श्रेयवादाचा वाद आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.