परतवाडा पोलीस स्टेशन व स्था. गु.शा अमरावती ग्रामिण यांची विशेष कामगिरी काही तासाचे आतच केले खुनाचे गुन्हयातील आरोपी अटक

परतवाडा पोलीस स्टेशन व स्था. गु.शा अमरावती ग्रामिण यांची विशेष कामगिरी काही तासाचे आतच केले खुनाचे गुन्हयातील आरोपी अटक

परतवाडा - 
परतवाडा शहरात दिलराजसिंग राजेंद्रसिंग बावरी, वय २७ वर्ष, जात सिखलकर, धंदा घरकाम, रा. आठवडी बाजार, मोर्शी ता. मोर्शी जिल्हा अमरावती ही तीच्या चुलत भावाचे लग्नाकरीता परतवाडा येथे आली असतांना वरातीत नाचण्याचे कारणावरून फिर्यादीचे पती राजेंद्रसिंग किसनसिंग बावरी यांच्या सोबत यातील आरोपी नामे विरूसिंग जयसिंग बावरी, वय ३५ वर्ष, रा. आझाद नगर परतवाडा, धरमसिंग जयसिंग बावरी, वय ३० वर्ष, रा. आझाद नगर परतवाडा, कुलदिपसिंग जयसिंग बावरी, वय २८ वर्ष, रा. आझाद नगर परतवाडा, कालुसिंग पापासिंग बावरी, वय २५ वर्ष, रा. आझाद नगर परतवाडा यांचा वाद झाला होता. परंतु ते सर्वजन नातेवाईक असल्याने त्यांनी सदरचा वाद आपसात मिटवला होता. लग्नाचे कार्यक्रम आटोपल्यानंतर फिर्यादी व तीचे पती व मुलासह तसेच जेठ गोलु उर्फ अशोकसिंग बावरी व ईतर नातेवाईक यांच्या सोबत मोटर सायकलने मोर्शीला जात असतांना दिनांक १९/०५/२०२६ चे रात्री ०८/३० वाजताचे सुमारास चांदुर बाजार रोडवरील बेलज फाटा येथे आरोपीतांनी बेकायदेशीर जमाव जमवुन फिर्यादीचे पतीचे दुचाकीला अमनसिंग नानकसिंग बावरी, वय २० वर्ष, रा. आझाद नगर परतवाडा याने खाली पाडुन फि चे पतीच्या उजव्या बाजुला पोटाच्यावर चाकुने मारले. तसेच फिर्यादीचे जेठ अशोकसिंग याला सुध्दा आरोपी कुलदिपसिंग जयसिंग बावरी, वय २८ वर्ष, रा. आझाद नगर परतवाडा याने केस धरून खाली पाडले व आरोपी विरूसिंग जयसिंग बावरी, वय ३५ वर्ष, रा. आझाद नगर परतवाडा याने चाकुने डोक्यावर डाव्या बाजुला मारून जखमी केले. तसेच यातील आरोपींनी फिर्यादीचे पती व जेठ यांना काठी व लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी धरमसिंग जयसिंग बावरी, वय ३० वर्ष, रा. आझाद नगर परतवाडा याने फिर्यादीचे पती व जेठला लाकडी काठीने मारहान केली. त्यानंतर राजेद्रसिंग बावरी व अशोकसिंग बावरी यांना उपचाराकरीता सरकारी दवाखाना चांदुर बाजार येथे नेले. तेथुन फिर्यादी ही रिपोर्ट देण्याकरीता पोलीस स्टेशनला आली व रिपोर्ट देत असतांना त्यांना समजले की, त्यांचे पती राजेंद्रसिंग बावरी यांचा खाजगी हॉस्टीटल मध्ये उपचार घेत असतांना मृत्यु झाला आहे. अश्या फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून परतवाडा पोलीस स्टेशन अपराध क्रमांक ३५९/२०२६ कलम १०३(१), १०९(१), १८९(२), १८९ (४), १९०, १९१(२), १९१ (३) भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद आहे.
सदर घटनेचे गांभिर्य पाहता सदर गुन्हयात आरोपीना लवकरात लवकर अटक करण्याबाबत मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी सुचित केले आहे. त्यासंदर्भाने पोलीस स्टेशन परतवाडा डि बी पथक तसेच स्था गु शा पथक यांना मार्गदर्शन करून आरोपी अटकेबाबत आदेशित केले आहे. पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांनी मृतक व आरोपी यांचे नातेवाईकांना सखोल तपासणी करून तसेच त्यांचेकडुन त्यांचे नातेवाईकांचे मोबाईल क्रमांक व पत्ते प्राप्त करून आरोपींचा शोध घेण्याचा कसोशिने प्रयत्न करण्यात आला. सदर गुन्हयातील आरोपीतांच्या ठावठिकाण्याबाबत कोणतीही माहीती नसतांना तसेच त्यांचे नातेवाईकांकडुन देखील कोणतीही माहीती प्राप्त होत नव्हती. तसेच त्यांचे मोबाईल बंद असल्यामुळे कोणतेही लोकेशन प्राप्त होत नसतांना सुध्दा कौशल्य वापरून तसेच गोपनिय माहीतीचे आधारे मोठ्या शिताफिने शोध घेवुन सदर गुन्हयात आरोपी नामे ०१) बिजलसिंग पटेलसिंग बावरी, वय ५२ वर्ष रा. आझाद नगर परतवाडा ०२) अमनसिंग नानकसिंग बावरी, वय २० वर्ष, रा. आझाद नगर परतवाडा०३) कनिल उर्फ चिनी नंदकिशोर जांभेकर, वय २० वर्ष, रा. अंजनगाव स्टॉप परतवाडा ०४) विरूसिंग जयसिंग बावरी, वय ३५ वर्ष, रा. आझाद नगर परतवाडा ०५) धरमसिंग जयसिंग बावरी, वय ३० वर्ष, रा. आझाद नगर परतवाडा ०६) कुलदिपसिंग जयसिंग बावरी, वय २८ वर्ष, रा. आझाद नगर परतवाडा ०७) कालुसिंग पापासिंग बावरी, वय २५ वर्ष, रा. आझाद नगर परतवाडा ०८) अजयसिंग बिजलसिंग बावरी, रा. आझाद नगर परतवाडा यांना ताब्यात घेवुन गुन्हयात अटक केली आहे. तसेच सदर गुन्हयात आरोपी नामे ०१) नानकसिंग पटेलसिंग बावरी, रा. आझाद नगर परतवाडा, ०२) अभयसिंग नानकसिंग बावरी, रा. आझाद नगर परतवाडा हे अजुन पर्यंत फरार असुन त्यांचा शोध घेणे सुरू आहे.
 सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. निकेतन कदम, अपर पोलीस अधिक्षक मा.श्री. दत्ता तोटेवाड, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपुर मा. श्री. मनिष ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के ठाणेदार परतवाडा, स.पो.नि. सलिम शेख पोलीस स्टेशन परतवाडा, पि एस आय सागर हटवार स्था गु शा अमरावती ग्रा. पोलीस स्टेशन परतवाडा येथिल पो हे कॉ सचिन होले सुधिर राउत, पो कॉ, विवेक ठाकरे, प्रविण बाखडे, सचिन कोकणे, जितेश बाबील तसेच स्था गु शा पथकातील पो हे कॉ बळवंत दाभणे, रवि बावणे, भुषण पेठे, पो कॉ पंकज फाटे, चालक पो कॉ प्रशिक वानखडे यांनी केली आहे.