नमस्कार,
सध्या भारतात सगळीकडे शहरी आणि ग्रामीण भागात सत्ता पक्षाच्या नेत्यांकडून धर्माचा वापर करून जाती जाती मधे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.एवढच नाही तर धर्मा धर्मात सुद्धा तेढ वाढत चाललेली दिसते.हे कृत्य संविधानाला धरून नाही.देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळवतानी संविधानाला धरून आपल्या पक्षाची मान्यता घेतली आहे.सर्वच पक्षांनी धर्म निरपेक्ष राहून आमचा पक्ष काम करेल अशाच बायलॉज मधे उल्लेख केला आहे.त्या प्रमाणे कृती न केल्यास पक्षाची मान्यता रद्द करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत.पण निवडणूक आयोगाचे याकडे दुर्लक्ष असल्याने किव्वा निवडणूक आयोग सत्ता पक्षाच्या दबावाखाली काम करत असल्याने देशात धर्मवाद मोठ्याप्रमाणात फोफावलेला आहे.एकीकडे सविधानाची शपथ घेणारे धर्मवाद करून देशाचा वातावरण बिघडवत आहेत.दुसरीकडे भारत माता की जय म्हणणारे म्हणजे भारत भूमीवर असणाऱ्या सर्वांचीच जय असा त्याचा अर्थ समजावा लागेल तेच लोक बटेंगे तो कटेंगे म्हणतात हे कस शक्य आहे.हे समजणे गरजेचे आहे.एकीकडे आम्ही वारकरी संप्रदायाला मानणारे आहोत असे सांगत असताना हिंदुत्ववादी वारकरी कसे होऊ शकतात.वारकरी संप्रदायात एका धर्माचा प्रचार नसून इन्सानियत मेरा पक्ष है । सबकी भलाई मेरा धर्म है । हेच शिकवले आहे.या सत्ताधाऱ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आवडतात,कारण महाराजांच्या पुण्यतिथीला गुरुकुंज आश्रम मोजरी जिल्हा अमरावती येथे सर्वच पक्षाचे मान्यवर नेते दरवर्षी उपस्थित असतात तिथे सर्व धर्माची प्रार्थना होते त्यावर कोणीही आपली विरोधात भूमिका मांडत नाही ते केवळ गुरुदेव सेवा मंडळाच्या विचाराने चालणाऱ्या भक्तांची सहानुभूती मिळविण्यासाठी केविलवाणी धडपड असावी का कारण तिथून बाहेर पडल्यावर पुन्हा धर्मवाद,जातीवादाची तेच लोक भाषा वापरून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करतात अश्या संधी साधू नेत्यांपासून पुरोगामी आणि संविधानाला मानणाऱ्या शाहू.फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,सावित्री बाई फुले,संभाजी महाराज,तुकाराम महाराज,ज्ञानेश्वर महाराज,गाडगेमहाराज,इत्यादी महापुरुषांना आणि संतांना मानणाऱ्या पुरोगामी विचाराच्या लोकांनी सावध राहावे.
चरण वाघमारे
माजी आमदार
तुमसर.