जनतेच्या आरोग्यासाठी ज्योत्सनाताई धवसे आक्रमक ; नालेसफाई कामांची घेतली झाडाझडती

☆ जनतेच्या आरोग्यासाठी ज्योत्सनाताई धवसे आक्रमक ; नालेसफाई कामांची घेतली झाडाझडती

 ☆ पावसाळ्यापूर्वी शहर स्वच्छ व सुरक्षित करण्यासाठी मैदानात उतरल्या आरोग्य सभापती; प्रशासनाला दिल्या स्पष्ट सूचना

तालुका प्रतिनिधी : 
नांदगाव खंडेश्वर : जनतेच्या आरोग्याचा प्रश्न सर्वोच्च मानत आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नांदगाव शहरातील नालेसफाई व जलनिस्सारण व्यवस्थेच्या कामांची आरोग्य व स्वच्छता सभापती सौ. ज्योत्सनाताई धवसे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली. शहरातील नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या गैरसोयींचा सामना करावा लागू नये, यासाठी त्यांनी विविध भागांमध्ये सुरू असलेल्या कामांची झाडाझडती घेतली.
यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निवृत्ती भालकर, आरोग्य स्वच्छता निरीक्षक पी. एन. सोनटक्के, तसेच कॉन्ट्रॅक्टर प्रतिनिधी व सुपरवायझर प्रतीक शिरसाट उपस्थित होते. शहरातील प्रमुख नाले, गटारी व जलनिस्सारण मार्गांची प्रत्यक्ष तपासणी करत कामांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला.
पाहणीदरम्यान ज्योत्सनाताई धवसे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पावसाळ्यापूर्वी शहरातील प्रत्येक नाला व गटार पूर्ण क्षमतेने कार्यरत असणे आवश्यक आहे. स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी."
जनतेच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या ज्योत्सनाताई धवसे यांनी स्वच्छता ही केवळ मोहीम नसून नागरिकांच्या आरोग्याशी निगडित जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले. त्यांच्या पुढाकारामुळे प्रशासन अधिक गतिमान झाले असून शहरातील स्वच्छता कामांना वेग आला आहे.पावसाळ्यापूर्वी सर्व प्रभागांतील नालेसफाईची कामे पूर्ण करून नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व रोगमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या ज्योत्सनाताई धवसे यांच्या सक्रिय भूमिकेची शहरात सकारात्मक चर्चा सुरू आहे.