आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली चांदूर रेल्वे एस.टी. डेपो व्यवस्थापकांना घेराव; तिकीट दर कमी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
चांदूर रेल्वे :
नवीन उड्डाणपूल सुरू होऊन दोन वर्षे उलटली तरी एस.टी. महामंडळाकडून अद्यापही जुन्या, लांबच्या मार्गानुसारच प्रवाशांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. या वाढीव तिकीट दरांचा आर्थिक फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. याविरोधात माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने चांदूर रेल्वे एस.टी. डेपो व्यवस्थापकांना घेराव घालून जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या दबावामुळे आगार व्यवस्थापकांनी मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

तिकीट आणि पासचे दर तातडीने कमी करण्याची मागणी
नवीन उड्डाणपुलामुळे अंतर कमी झाले असतानाही महामंडळ जुन्याच अंतराचे भाडे वसूल करत आहे. चांदूर रेल्वे ते सोनगाव, कळमगाव, कळमजापूर, बग्गी, जवळा निंभा आणि राजुरा या मार्गांवरील तिकीट व पासचे दर तातडीने कमी करण्यात यावेत, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. तसेच, गेल्या दोन वर्षांपासून प्रवाशांकडून बेकायदेशीरपणे वसूल करण्यात आलेली अतिरिक्त रक्कम त्यांना परत करण्यात यावी, अशी ठाम भूमिका आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांनी मांडली. एस.टी. महामंडळाने प्रवाशांच्या खिशाला लागणारी कात्री थांबवून त्वरित योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

अस्वच्छता आणि पाण्याच्या समस्येवरून प्रशासनाचे टोचले कान
एस.टी. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवत, प्रवाशांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्नही या आंदोलनात लावून धरण्यात आला. चांदूर रेल्वे एस.टी. डेपो परिसरातील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता राखली जात नसल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच डेपोमध्ये प्रवाशांसाठी स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था नाही. या दोन्ही समस्या तातडीने सोडवण्याची मागणी करत, प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि परवडणारी वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे ही महामंडळाची नैतिक जबाबदारी असल्याचे काँग्रेसने प्रशासनाला सुनावले.

जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेसच्या या आक्रमक आंदोलनाला परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, पालक आणि कामगारांनी मोठा पाठिंबा दिला. नागरिकांच्या वाढत्या रोषामुळे अखेर आगार व्यवस्थापकांनी नमते घेत, मागण्यांवर सकारात्मक व गतिमान कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन आंदोलनस्थळी दिले.