शरद अग्रवाल यांनी दिला भाजप गटनेते पदाचा राजीनामा

शरद अग्रवाल यांनी दिला भाजप गटनेते पदाचा राजीनामा

राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत : नगराध्यक्षांनीही घेतली आमदारांची भेट

शेगाव - 
 येथील नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक, भाजपचे नगरपालिकेतील गटनेते शरदशेठ अग्रवाल यांनी नुकताच एका बैठकीत आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्याकडे आपल्या गटनेते पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा शहरात सुरु आहे. यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात असून अचानकपणे त्यांनी राजीनामा का दिला? हे न समजणारे कोडे ठरले आहे. दरम्यान सोमवारी जिल्हा अधिकारी यांच्याकडे अधिकृतपणे ते राजीनामा देणार असल्याची माहिती मिळाली.

येथील नगरपरिषद मध्ये नगराध्यक्ष पद काँग्रेसकडे तर बहुमत भारतीय जनता पक्षाकडे आहे. गेल्या काही महिन्यांपासून नगरपालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते शरदशेठ अग्रवाल यांच्याकडे भाजप गटनेते पदाची जबाबदारी आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी शेगाव शहरात स्थानिक विश्रामगृह येथे भारतीय जनता पक्षाच्या नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीदरम्यान गटनेते शरद अग्रवाल

नगराध्यक्ष व आमदाररांचे भेटीवरूनही चर्चेला उधान

भाजपच्या बैठकीदरम्यान आमदार डॉ. संजय कुटे यांची शेगाव शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांनी सुद्धा अचानक त्या ठिकाणी हजेरी लावत भेट घेतली. त्यावरूनही शहरात विविध प्रकारची चर्चा सुरू आहे.

विकासकामाबाबत चर्चा : नगराध्यक्ष शेगोकार

शेगाव शहरामध्ये नगराध्यक्षांनी भाजप नगरसेवकांच्या बैठकीत उपस्थिती लावल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. याबाबत थेट नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माझा भाजप नगरसेवकांच्या बैठकीशी कोणताही संबंध नव्हता. मी शहरातील काही विकास कामांच्या संदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी तसेच पालिकेतील विद्युत विभाग, बांधकाम विभाग व अन्य विभागाचे अभियंता यांचेसह आमदार साहेबांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नव्हते. आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी असल्याने आमदार डॉ. संजय कुटे यांची भेट घेऊन त्यांच्याशी शहरात काम करत असताना पालिकेला आलेल्या काही अडचणीवर तोडगा काढणे तसेच विकासात्मक कामासाठी निधी मागणी संदर्भात आम्ही त्यांना भेटून सकारात्मक चर्चा केली आहे, असे नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांनी स्पष्ट केले आहे.

यांनी मला या जबाबदारीतून मुक्त करा अशी विनंती करत आपला गटनेतेपदाचा लेखी राजीनामा आमदार डॉक्टर संजय कुटे यांना सुपूर्द केल्याची माहिती मिळाली आहे. कोणत्याच प्रकारची आधी चर्चा नसताना अचानकपणे त्यांनी वैयक्तिक कारणामुळे आपला राजीनामा दिला की आणखी पक्षांतर्गत काही दुसरे

कारण आहे हे मात्र अद्याप समजले नाही. यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क लढवले जात आहेत. गटनेते शरद शेठ अग्रवाल यांनी दिलेल्या राजीनामामुळे नगरपरिषद मधील भारतीय जनता पक्षाची पालिका राजकारणातील ही नवीन खेळी आहे की काय ? अशी चर्चा रंगू लागली आहे.