नांदगाव खंडेश्वर -
कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी नगर पंचायत नांदगाव खंडेश्वर येथे 'महिला तक्रार निवारण समिती' स्थापन करण्यात आली आहे. नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या आदेशान्वये या समितीची अधिकृत रचना जाहीर करण्यात आली आहे.

शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे विविध निर्णय, परिपत्रके आणि नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या (नवी मुंबई) आदेशांनुसार या समितीची स्थापना करण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित आणि सन्मानकारक वातावरण मिळावे, हा या समितीचा मुख्य उद्देश आहे.
समितीची रचना खालीलप्रमाणे आहे:
- समिती अध्यक्ष: कु. माधुरी खरे (लिपिक)
- समिती सचिव: श्रीमती उज्वला पोफळे (सहाय्यक प्रकल्प अधिकारी)
- सदस्य: निकिता अतुल मेटकर (तांत्रिक सहाय्यक)
- सदस्य: कु. साक्षी गणोरकर (शहर समन्वयक)
- सदस्य: श्री करण सोयाम (कार्यालय अधीक्षक)
- सदस्य: सौ. रेखा नागोलकर
या समितीच्या माध्यमातून कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे कायदेशीर व वेळेत निवारण केले जाईल, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.