ओंकारखेडा -
येथे बैल पोळ्याचे औचित्य साधून भव्य बैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणात हा सोहळा पार पडला. या रंगतदार स्पर्धेत सत्यम भेंडरकर यांच्या बैलजोडीच्या सजावटीने प्रथम क्रमांक पटकावला.स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
विजेत्यांची नावे आणि त्यांना मिळालेली बक्षिसे खालीलप्रमाणे आहेत:प्रथम क्रमांक: सत्यम भेंडरकर (रु. ७,७७७ - नगरसेविका सौ. प्रीती इखार यांच्यातर्फे)द्वितीय क्रमांक: प्रशांत हुकरे (रु. ५,५५५ - न.प. सभापती वासुदेव लोखंडे यांच्यातर्फे)तृतीय क्रमांक: रमेश चतुरकर (रु. ३,३३३ - सौ. जयश्री सुहागपुरे यांच्यातर्फे)चतुर्थ क्रमांक: अतुल तांबसकर (रु. ३,००१ - निलेश इखार यांच्यातर्फे)पाचवा क्रमांक: अरुण गिरी (रु. २,२२२ - नगरसेवक कांताबाई लोमटे यांच्यातर्फे)सहावा क्रमांक: राहुल नेवारे (रु. १,००१ - निलेश इखार यांच्यातर्फे)प्रोत्साहनपर बक्षिसे आणि विशेष भेट:स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या अंकुश चव्हाण, मुकिंद सोळंके, उमेश कावरे, विनोद पोफळे, राहुल नेवारे आणि ईश्वरदास पोफळे यांना प्रत्येकी ५०१ रुपये देऊन प्रोत्साहनपर सन्मानित करण्यात आले. तसेच, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व शेतकरी बांधवांना नगराध्यक्ष सौ. प्राप्ती मारोटकर यांच्या वतीने 'घड्याळ' भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष अब्दुल जमीर स्विकृत नगरसेवक मो.साजिद यांचेसह स्थानिक नागरिक, शेतकरी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुंदर सजवलेले बैल आणि शेतकऱ्यांचा उत्साह यामुळे या सोहळ्याने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले.