प्रमोद मारोटकर यांच्या बैलजोडीला ५५,५५ रुपयांचा प्रथम पुरस्कार; ५० हून अधिक शेतकऱ्यांचा गौरव
नांदगाव खंडेश्वर (तालुका प्रतिनिधी) -
स्थानिक मुंगसाजी महाराज चौकात पोळा उत्सवाचे औचित्य साधून भव्य बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय संजय लीलाधरजी पारसकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'पारसकर कृषी केंद्रा'च्या वतीने माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर व अभिषेक पारसकर यांनी या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या देखण्या आणि सजवलेल्या बैलजोड्यांसह उत्साहाने सहभाग घेतला.

विजेत्या बैलजोड्यांना लाखो रुपयांची बक्षिसे
स्पर्धेत उत्कृष्ट सजावट आणि रुबाबदारपणाच्या जोरावर प्रमोद मारोटकर यांच्या बैलजोडीने ५५,५५ रुपयांचा प्रथम पुरस्कार पटकावला. तर आसिफखा यांच्या बैलजोडीला ३३,३३ रुपयांचा द्वितीय पुरस्कार आणि गजानन शिरभाते यांच्या बैलजोडीला २२,२२ रुपयांचा तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यासोबतच, पोळ्यानिमित्त तोरणाखाली आलेल्या सर्व बैलजोडी मालकांचा आणि शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
बैलजोडी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ शेतकरी तथा माजी सरपंच देविदासजी सुने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून नांदगावचे ठाणेदार आनंद पीदुरकर, आयोजक माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर, अभिषेक पारसकर, कावड यात्रा समितीचे डॉ. भूषण पोतदार, माजी नगराध्यक्ष संजय पोपळे आणि नगरसेवक योगेश चवाळे उपस्थित होते.

याशिवाय मंचावर अविनाश ब्राह्मणवाडे, वैभव कोंडवते, घनश्यामजी सारडा, प्रदीप जोशी, अरुण लहाबर, गजानन मारोटकर, गुणवंतराव कोळमकर, अरुणभाऊ गुल्हाने, गजानन डोक, अशोक दैत आणि विजय सुने आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. स्पर्धेचे चोख परीक्षण नागोरावजी दिघडे, संजय अंभोरे, उमेश चौकडे, सुरेशराव रावेकर, महादेवराव काळेकर, मुमताजभाई कुरेशी, महादेवराव सोनोने आणि अनिल शिरभाते यांनी केले.
युवा कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि यशस्वी नियोजन
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मारोतराव लाहाबर, अमोल ढंगारे, उमेश सोनोने, ऋषिकेश मारोटकर, प्रसाद चांदणे, अक्षय मारोटकर, अंकित काळेकर, अनिकेत मरोटकर, सागर लाड, विशाल काळेकर, अमन काकडे, ओम काळेकर, कृष्णा पारसकर, ओम मारोटकर यांच्यासह नांदगावातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि बहारदार सूत्रसंचालन डॉ. संजय जेवडे यांनी केले. या स्पर्धेमुळे नांदगावच्या पोळा उत्सवात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.