नांदगाव खंडेश्वर : प्रभाग क्र. १० मधील अस्वच्छता आणि भटक्या कुत्र्यांच्या त्रासाविरोधात नगरसेविका आयशा शेख जमील यांचे मुख्याधिकार्यांना निवेदन!
नांदगाव खंडेश्वर :
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक १० मधील अनियमित साफसफाई, नाल्यांमधील साचलेली घाण आणि वाढता भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नगरसेविका आयशा शेख जमील यांनी नगर पंचायत प्रशासनाला जाहीर निवेदन सादर केले आहे.

प्रभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी मुख्याधिकार्यांकडे केली आहे. नगरसेविका आयशा शेख जमील यांनी निवेदनात खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत :
- नाल्यांची साफसफाई : प्रभाग क्रमांक १० मधील सर्व नाल्यांची तातडीने व योग्य पद्धतीने स्वच्छता करण्यात यावी.
- कर्मचार्यांच्या हजेरीची चौकशी : सफाई कर्मचार्यांच्या कर्तव्याची (ड्यूटी) चौकशी करून प्रभागात नियमित साफसफाई सुनिश्चित करावी.
- कचरा निर्मूलन : प्रभागात ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि घाण उचलण्यासाठी आवश्यक ती कडक कारवाई केली जावी.
- भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त : प्रभागात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, लहान मुले व वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नियमानुसार या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा.
- कडक निर्देश : संबंधित विभागाच्या अधिकार्यांना व कर्मचार्यांना या समस्या निकाली काढण्यासाठी कडक निर्देश देण्यात यावेत.