शिक्षक मतदारसंघ निवडणूक: पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी चंद्रशेखर भोयर यांच्यासह ४ जणांचे भाजपातून ६ वर्षांसाठी निष्कासन
नागपूर :
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजपा) शिस्तभंगाची मोठी कारवाई केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध काम करणे आणि पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे, सुमित पवार आणि नितीन गुडधे या चार पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित (पक्षाबाहेर) करण्यात आले आहे.

भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रतापदादा अडसड यांनी या कठोर कारवाईची अधिकृत माहिती दिली आहे.
पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार रिंगणात असताना, पक्षाच्या ध्येय-धोरणांविरुद्ध आणि शिस्तीला तडा जाईल असे वर्तन या पदाधिकाऱ्यांकडून घडल्याचे समोर आले होते. पक्षविरोधी कारवायांची गंभीर दखल घेत प्रदेश नेतृत्वाच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष आमदार प्रतापदादा अडसड यांनी ही हकालपट्टीची कारवाई केली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, पक्षांतर्गत बंडखोरी किंवा शिस्तभंग खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा या निमित्ताने पक्षाने दिला आहे.