नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचे स्थापत्य अभियंता विकास सपकाळ यांची चिखली येथे बदली; मुख्याधिकारी व सहकाऱ्यांकडून सत्कार
नांदगाव खंडेश्वर :
येथील नगरपंचायतमध्ये कार्यरत असलेले स्थापत्य अभियंता श्री. विकास सपकाळ यांची बुलढाणा जिल्ह्यातील चिखली नगरपरिषद येथे बदली झाली आहे. या निमित्ताने नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री. विकास सपकाळ यांनी आपल्या कार्यकाळात नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत अंतर्गत विविध विकासकामांमध्ये आणि महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यतत्परतेबद्दल आणि प्रशासकीय कौशल्याबद्दल मुख्याधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. या निरोप समारंभाप्रसंगी नगरपंचायतीमधील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, ज्यांनी सपकाळ यांना पुष्पगुच्छ देऊन भावी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. चिखली नगरपरिषद येथे नवीन जबाबदारी स्वीकारत असताना त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.