अमरावती -
अमरावती येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत स्थानिक विजया कॉन्व्हेंट स्कूलचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी सिद्धार्थ राहुल वंजारी याने चमकदार कामगिरी केली आहे. १४ वर्षांखालील (Under 14) वयोगटात खेळताना त्याने मिळवलेल्या घवघवीत यशामुळे त्याची विभागीय कॅरम स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
विजया कॉन्व्हेंट स्कूलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा विद्यार्थी कॅरम स्पर्धेत विभागीय स्तरावर पोहोचल्यामुळे शाळेत आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. सिद्धार्थने आपल्या या यशाचे श्रेय त्याचे आई-वडील, शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम पद्मश्री देशमुख आणि क्रीडा शिक्षक (स्पोर्ट टीचर) चैतन्य ठाकरे यांना दिले आहे. शाळेच्या वतीने त्याला पुढील विभागीय स्पर्धेसाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
सदर जिल्हास्तरीय स्पर्धेचे नेटके नियोजन जिल्हा क्रीडा अधिकारी, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सिद्धार्थच्या या यशाबद्दल क्रीडा अधिकारी श्री. प्रफुल डांगे, संदेश गिरी, अशोक श्रीवास, मेहंदी अली, जहूर भाई, विकास रुईकर आणि नीता तायडे यांनी त्याचे विशेष कौतुक केले असून सर्व पात्र खेळाडूंना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.