- उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रस्ते दुरुस्तीचे काम सुरू असताना ‘राजकीय झाकनझुल्यांकडून’ सोशल मीडियावर फोटोबाजीचा सुळसुळाट.
- 'स्टेट बँक चौक ते अप्सरा टॉकीज' रस्त्याची दुरुस्ती पूर्ण; नागरिकांकडून पजगाडे यांच्या जनहित याचिकेचे कौतुक.
यवतमाळ -
यवतमाळ नगर परिषद हद्दीतील क्षतिग्रस्त आणि खड्डेमय रस्त्यांची गंभीर दखल घेत मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक आदेशानुसार सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, न्यायालयीन लढाई लढून सामान्य जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या या कामाचे श्रेय लाटण्यासाठी सध्या यवतमाळमधील काही भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते पुढे सरसावले असून, ते सोशल मीडियावर फोटो टाकून ‘हलकी लोकप्रियता’ मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप प्रसिद्ध समाजसेवक दिगांबर पजगाडे यांनी केला आहे.

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात समाजसेवक दिगांबर पजगाडे यांनी मा. उच्च न्यायालयात क्रिमिनल जनहित याचिका क्र. २/२०१९ दाखल केली होती. या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मा. उच्च न्यायालयाने यवतमाळ शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेची तीव्र दखल घेतली. न्यायालयाने २१ एप्रिल २०२६ रोजी यवतमाळ नगर परिषदेला शहरातील सर्व क्षतिग्रस्त रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे कडक आदेश दिले होते.
न्यायालयाच्या याच चाबुकानंतर नगर प्रशासनाला जाग आली आणि शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरण व दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली. याच आदेशाचा भाग म्हणून काल शहरातील अत्यंत महत्त्वाच्या 'स्टेट बँक चौक ते अप्सरा टॉकीज रोड' या रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.
श्रेय लाटणाऱ्या ‘राजकीय झाकनझुल्यांची’ सोशल मीडियावर नौटंकी :
न्यायालयाच्या आदेशामुळे व दिगांबर पजगाडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे रस्ते चकाचक होत असताना, काही भाजप नेत्यांनी डांबरीकरण सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन स्वतःचे फोटो काढण्याचा धडाका लावला आहे. "आम्हीच हे काम मंजूर करून आणले," असा खोटा आव आणत हे फोटो फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले जात आहेत.

यावर संतप्त प्रतिक्रिया देताना समाजसेवक दिगांबर पजगाडे म्हणाले, "वर्षानुवर्षे जनता खड्ड्यांचा त्रास सहन करत होती, तेव्हा हे राजकीय झाकनझुले कुठे होते? जेव्हा न्यायालयाने आदेश देऊन काम करून घेणे बंधनकारक केले, तेव्हा हे लोक डांबराच्या गाडीसमोर उभे राहून फोटो काढत आहेत. जनतेला सर्व ठाऊक आहे की हे काम कोणाच्या प्रयत्नाने आणि कोणाच्या आदेशाने होत आहे. अशा हलक्या लोकप्रियतेचा आम्ही निषेध करतो."
दरम्यान, रस्ता दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष पाहणी करून पजगाडे यांनी जनहितार्थ व पारदर्शकतेसाठी या कामाचे फोटो जारी केले आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे अखेर यवतमाळकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, याचिकाकर्ते दिगांबर पजगाडे यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.