नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याचा तात्पुरता प्रभार डॅशिंग अधिकारी सुरज तेलगोटे यांच्याकडे; पदभार, गुन्हेगारांचे धाबे दणाणले !

नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याचा तात्पुरता प्रभार डॅशिंग अधिकारी सुरज तेलगोटे यांच्याकडे; पदभार, गुन्हेगारांचे धाबे दणाणले !

नांदगाव खंडेश्वर 
( दि. ९ ऑक्टोबर २०२६ )
नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याचे मुख्य ठाणेदार सुट्टीवर गेल्याने, त्यांच्या जागी पोलीस ठाण्याचा तात्पुरता प्रभारी पदभार येथील डॅशिंग आणि कडक शिस्तीचे अधिकारी सुरज तेलगोटे यांच्याकडे आजच सोपवण्यात आला आहे. आपल्या कडक कार्यपद्धतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तेलगोटे यांनी पदभार स्वीकारताच अभ्यास करुन समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कडक पावले उचलणार असल्याचे पोलीस प्रशासनात बोलले जात आहे.
पदभार हाती घेताच तात्पुरते प्रभारी ठाणेदार सुरज तेलगोटे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी त्यांनी स्वत: मैदानात उतरून पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देणार असल्याचे समजते.
ठाणेदार तेलगोटे यांच्या या 'ॲक्शन मोड'मुळे तालुक्यातील गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याच्या त्यांच्या या धडक मोहिमेचे सर्वसामान्य नागरिकांमधून स्वागत होत असून, यामुळे परिसरातील गुन्हेगारीला चाप बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.