श्रेयवादाच्या राजकारणात नांदगाव खंडेश्वरचा विकास कोंडीत; लोकप्रतिनिधींना डावलल्याने 'प्रोटोकॉल'वरून वाद उफाळला !
नांदगाव खंडेश्वर ▪
सध्या नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत वर्तुळात विकासकामांच्या श्रेयावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण सध्या तालुक्यात सुरू असून, या श्रेयवादाच्या लढाईत मात्र सर्वसामान्य जनतेचा आणि शहराच्या विकासाचा बळी जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नुकताच एका प्रभागातील जुन्या मंजूर कामाच्या भूमिपूजन आणि पूर्णत्वावरून लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात वाद उफाळून आला असून, थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रार पोहोचली आहे.

वास्तविक पाहता, नियोजन विभागामार्फत नगर पंचायत परिक्षेत्रात विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून एका प्रभागात महत्त्वपूर्ण विकासकाम मंजूर झाले. हे काम संबंधित लोकप्रतिनिधी निवडून येण्यापूर्वी मंजूर झालेले असले, तरी ते सध्या त्यांच्याच प्रभागात येत असल्यामुळे लोकशाहीच्या संकेतानुसार आणि शासकीय राजशिष्टाचाराच्या (प्रोटोकॉल) नियमांनुसार स्थानिक नगरसेवकाला सन्मानपूर्वक निमंत्रित करणे बंधनकारक होते.
परंतु, प्रशासकीय पातळीवर इतर राजकीय दबावापोटी की काय, या प्रभाग प्रतिनिधीला चक्क डावलण्यात आले. केवळ ऐनवेळी फोनवर माहिती देऊन भूमिपूजनाचे सोपस्कार पार पाडण्यात आले आणि आता काम पूर्ण होऊन बिल निघेपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधीला अंधारात ठेवले गेले. आपल्याच प्रभागातील कामात प्रशासनाने डावलल्यामुळे संतापलेल्या एका विद्यमान नगरसेविकेने थेट अमरावतीचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाईसाठी धाव घेतली आहे.
जनतेची कोंडी, राजकारण्यांची चांदी !
नांदगाव खंडेश्वरमध्ये सध्या 'काम कुणाचे आणि श्रेय कुणाचे' यावरून अंतर्गत वाद पेटले आहेत. काम जुने असले तरी प्रभाग आपलाच आहे, या भूमिकेवर लोकप्रतिनिधी ठाम आहेत, तर दुसरीकडे राजकीय गटबाजीमुळे प्रशासनाला हाताशी धरून दुसऱ्यांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. राजकारण्यांच्या या 'श्रेयवादाच्या' लढाईत मात्र जनतेच्या हिताचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. अधिकारी वर्गही राजकीय दबावापुढे झुकून शासकीय प्रोटोकॉल बाजूला सारत असल्याचा आरोप होत आहे.

प्रशासनाचा वचक संपला का ?
शासकीय नियमांनुसार कोणत्याही विकासकामाच्या कार्यक्रमाची लेखी निमंत्रण पत्रिका किमान ३ ते ७ दिवस आधी स्थानिक लोकप्रतिनिधीला मिळणे गरजेचे असते. मात्र, नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीत या नियमांना हरताळ फासला जात असल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट होते. हा वाद केवळ एका कामापुरता मर्यादित नसून, भविष्यात यामुळे स्थानिक राजकारणात आणखी मोठा स्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आता या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरून काय कारवाई होते आणि हा श्रेयवादाचा वाद शांत होतो की अधिक चिघळतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.