दारव्हा :
भारतीय जनता पार्टी दारव्हा शहर महिला आघाडीच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी दारव्हा शहर महिला आघाडीच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
लहान मुलांच्या आयुष्याचा पाया मजबूत करणे, त्यांच्यावर उत्तम संस्कार करणे आणि गरोदर माता-भगिनींना आरोग्याची योग्य दिशा दाखवून त्यांना मोलाचा आधार देणे, यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या याच निस्वार्थ सेवेचे कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला महिला आघाडीच्या अध्यक्षा अॅड. मनोरमा चव्हाण, भाजप जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय रहाणे, शहराध्यक्ष प्रकाश गोकुळे, नगरसेवक धनंजय बलखंडे आणि नगरसेवक रोनित गुल्हाने प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच याप्रसंगी भाजप महिला आघाडीच्या विविध पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.