मोझरी :
तिवसा तालुक्यातील मोझरी येथे एका ४३ वर्षीय महिलेने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना विजयादशमीला (मंगळवारी) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. लीना मंगेश साठवणे (वय ४३) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लीना साठवणे या गेल्या काही वर्षांपासून एका गंभीर आणि दुर्धर आजाराने त्रस्त होत्या. त्यांनी विविध वैद्यकीय तज्ज्ञांकडून उपचार घेतले होते, परंतु त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती. आजारपणाच्या जीवघेण्या आणि असह्य वेदनांमुळे, अखेर त्यांनी मंगळवारी सकाळी आपल्या राहत्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले.
घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदनासाठी) तिवसा उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तिवसा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.