धामक गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा! डॉ. वैभव लहानुजी चौधरी यांनी संपादन केली 'MD मेडिसिन' पदवी; गावातील पहिलेच डॉक्टर सुपुत्र !

धामक गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा! डॉ. वैभव लहानुजी चौधरी यांनी संपादन केली 'MD मेडिसिन' पदवी; गावातील पहिलेच डॉक्टर सुपुत्र !

धामक (नांदगाव खंडेश्वर) -
जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणांनी वैद्यकीय क्षेत्रात मारलेली झेप ही संपूर्ण परिसरासाठी भूषणावह ठरते. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक गावचे सुपुत्र डॉ. वैभव लहानुजी चौधरी यांनी 'MD मेडिसिन' ही उच्च वैद्यकीय पदवी संपादन करून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. धामक गावातील 'प्रथम डॉक्टर सुपुत्र' म्हणून हा बहुमान मिळवल्याने संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
डॉ. वैभव चौधरी हे लहानपणापासूनच शांत, संयमी, अभ्यासू आणि ध्येयाप्रती समर्पित वृत्तीचे आहेत. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर कठोर मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर हे यश खेचून आणले आहे. त्यांच्या या यशामागे अनेक वर्षांची खडतर साधना, कुटुंबाचा त्याग आणि शिक्षणाप्रती असलेली अढळ निष्ठा आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील या सर्वोच्च पदवीमुळे डॉ. वैभव चौधरी यांच्याकडून भविष्यात अनेक गरजू रुग्णांची उत्तम सेवा घडो आणि त्यांच्या ज्ञानाचा समाजाला मोठा लाभ होवो, अशी इच्छा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातून उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्यांनी गावातील इतर विद्यार्थी आणि तरुणाईसमोर शिक्षणाच्या माध्यमातून मोठी स्वप्ने पाहण्याचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण धामक परिसरामध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.