पतीसोबतच्या किरकोळ वादानंतर ९ वर्षांच्या मुलीसह घराबाहेर पडलेली साक्षी २१ दिवसांपासून बेपत्त; राजापेठ पोलिसांत तक्रार दाखल

पतीसोबतच्या किरकोळ वादानंतर ९ वर्षांच्या मुलीसह घराबाहेर पडलेली साक्षी २१ दिवसांपासून बेपत्ता; राजापेठ पोलिसांत तक्रार दाखल

अमरावती :
पतीसोबत झालेल्या किरकोळ कौटुंबिक वादानंतर रागाच्या भरात ९ वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन घरातून निघून गेलेली महिला गेल्या २१ दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. साक्षी नितेश पवार (रा. गोपाल नगर, अमरावती) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव असून, शोध घेऊनही ती न मिळाल्याने दोन्ही कुटुंबांची चिंता आता अत्यंत वाढली आहे. याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी साक्षी यांचे पती निलेश यांच्यासोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या वादातून संतप्त झालेल्या साक्षी यांनी आपल्या नऊ वर्षांच्या मुलीला सोबत घेतले आणि त्या माहेरी जाण्यासाठी निघून गेल्या. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या मुलीला घरी परत पाठवले, पण त्या स्वतः मात्र माहेरी किंवा सासरी परतल्या नाहीत.
साक्षी घरी न परतल्याने त्यांच्या पतीने तात्काळ माहेरच्या मंडळींशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी मिळून साक्षी यांचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान, १९ ऑक्टोबरपर्यंत साक्षी या शेगाव येथे असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्या नेमक्या कुठे आहेत, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही.
सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या या कौटुंबिक वादाचे रूपांतर आता मोठ्या गंभीर चिंतेत झाले आहे. पोलिसांनीही याप्रकरणी विविध ठिकाणी शोध घेतला आहे, मात्र अद्याप साक्षी यांचा कुठेही ठावठिकाणा लागलेला नाही. साक्षी या सुखरूप घरी परत याव्यात यासाठी दोन्ही कुटुंबांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

🚨 जाहीर आवाहन:
साक्षी पवार या कुठेही आढळून आल्यास किंवा त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन दोन्ही कुटुंबांच्या वतीने करण्यात आले आहे:
📞 9325997164
📞 8975705015