नांदगाव खंडेश्वर (प्रतिनिधी)
दुष्काळ आणि सरकारच्या अनास्थेमुळे होरपळत असलेल्या बळीराजाची फसव्या घोषणा करून क्रूर थट्टा करणाऱ्या फडणवीस सरकारविरुद्ध नांदगाव खंडेश्वर येथे शेतकऱ्यांनी आणि काँग्रेसने 'काळी दिवाळी' साजरी केली. माजी आमदार प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या खंबीर नेतृत्वात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी बांधवांनी तहसील कार्यालयासमोर बेसन भाकर आणून सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सुपूर्द करण्यात आले.

अतिवृष्टी आणि कोरड्या दुष्काळाने शेतकरी कोलमडला
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात काँग्रेसने सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावर्षी नांदगाव खंडेश्वर तालुक्याला सुरुवातीला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, शासनाकडून त्याचे केवळ कागदोपत्री पंचनामे झाले, प्रत्यक्ष मदत मिळाली नाही. त्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवल्याने तालुक्यात कोरड्या दुष्काळाची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. या दुहेरी संकटामुळे शेतकरी राजा पूर्णतः आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेला आहे.

माध्यमांमध्ये केवळ हेडलाईन्स; प्रत्यक्षात शेतकऱ्यांची क्रूर थट्टा
"शासन हे शेतकऱ्यांचे मायबाप असते, परंतु सध्याचे फडणवीस सरकार केवळ माध्यमांमध्ये हेडलाईन्स मिळवण्यासाठी स्वतःला शेतकऱ्यांचा कैवारी म्हणवून घेत आहे," असा घणाघाती आरोप यावेळी करण्यात आला. दिवाळीचा सण दारात आला असतानाही शेतकऱ्यांच्या पदरात दमडीचीही मदत पडलेली नाही. केवळ जाहिराती आणि फसव्या घोषणा करून हे सरकार शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

फडणवीस सरकारच्या 'फसव्या' घोषणांचा पाढा:
आंदोलकांनी सरकारच्या खालील घोषणांवरून प्रशासनाला धारेवर धरले:

- पिकविमा आणि कर्जमाफी: मागील वर्षीची पिकविमा घोषणा आणि सरसकट दोन लाखांच्या कर्जमाफीची घोषणा केवळ जाहिरातींपुरतीच मर्यादित राहिली.
- नुकसान भरपाई: अतिवृष्टीने जमिनी खरडलेल्या शेतकऱ्यांचे फक्त पंचनामे झाले, प्रत्यक्षात मदत शून्य.
- प्रोत्साहन अनुदान: नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना अद्याप प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळालेला नाही.
- दिवाळीची मदत: दिवाळीला ५००० रुपये देण्याची घोषणा ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा ठरणारी बाब आहे, कारण ही मदतही अद्याप कोणापर्यंत पोहोचलेली नाही.
"या सर्व फसव्या घोषणांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी पूर्णतः अंधारात गेली असून, फडणवीस सरकार निर्लज्जपणे आणि अमानुषपणे शेतकऱ्यांशी वागत आहे," असा थेट आरोप आंदोलनातून करण्यात आला. संकटग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा, कर्जमाफी, भरीव नुकसान भरपाई आणि प्रोत्साहन अनुदानाचा विनाअटी व विनाविंलब तात्काळ लाभ देण्यात यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनात नेत्यांची व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
या आंदोलनात माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस परीक्षित जगताप, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष समीर पाटील, अमोल होले, पंकज वानखडे, अमोल धवसे, निशांत जाधव, सुनील शिरभाते, सर्फराज खान, विनोद चौधरी, बाळासाहेब इंगळे, श्रीकांत गावंडे, गणेश आरेकर, विनोद जगताप, ओमप्रकाश सावळे, राजू सरोदे, दीपक सवई, रियाजभाई कुरेशी शेख हारुनभाई दीपक भगत, प्रवीण मोखळे, सुनील इंझळकर, प्रकाश इंझळकर, सुधीर पाटेकर, श्रीनिवास सूर्यवंशी, मोरेश्वर डिवटे, गजानन भडके, ज्योतिराव चवरे, प्रशांत ठाकरे, मनीष जगणे, प्रसाद भगत, संजय कुंभलकर, राहुल गुल्हाने, उमेश दहातोंडे, शिवाजी चव्हाण, हकीम भाई, प्रमोद उगले आणि संचालक गौतम सोनवणे यांच्यासह असंख्य शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशील थोरात यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रमेश ठाकरे यांनी मानले.