समाजकारण आणि राजकारणात चमकणारा नांदगाव खंडेश्वरचा तारा; तुषार दुधे अमरावती शहरात करतोय नाव रोशन !

समाजकारण आणि राजकारणात चमकणारा नांदगाव खंडेश्वरचा तारा; तुषार दुधे अमरावती शहरात करतोय नाव रोशन !

आज त्यांचा वाढदिवस जिद्द, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची तळमळ असेल तर ग्रामीण भागातील तरुणही मोठ्या शहरात स्वतःचे भक्कम स्थान निर्माण करू शकतो. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे सुपुत्र तुषार दुधे यांनी समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून अमरावती शहरात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे.
आज त्यांचा वाढदिवस असून, त्यानिमित्त त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाचा घेतलेला हा आढावा.
नांदगाव खंडेश्वरसारख्या ग्रामीण भागातून अमरावती शहरात येऊन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणे सोपे काम नाही. मात्र, तुषार दुधे यांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावाने आणि लोकांच्या प्रश्नांसाठी धावून जाण्याच्या वृत्तीने सर्वांची मने जिंकली आहेत. समाजातील सर्वसामान्य घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात.
गावाकडचे संस्कार आणि आधुनिक विचारांची सांगड घालत त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. अमरावती शहरात सक्रिय राहूनही त्यांनी आपल्या मातीशी आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्याशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. तरुणांचे प्रश्न असोत किंवा सामाजिक उपक्रम, तुषार नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभे राहतात. त्यांच्या या कार्यशैलीमुळे आज अनेक तरुण त्यांच्याकडे एक आदर्श आणि मार्गदर्शक म्हणून पाहतात.
सत्ता किंवा पदापेक्षा जनसेवेला महत्त्व देणारे नेतृत्व म्हणून तुषार दुधे यांची ओळख निर्माण होत आहे. त्यांच्या या कार्याचा नांदगाव खंडेश्वर तालुक्याला सार्थ अभिमान आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात उत्तुंग यश लाभो, हीच सदिच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !   
 आपला शुभचिंतक - राहुल सोमेश्ववराव गुल्हाने