अमरावती -
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सावर्डी नजीक एक थरारक आणि अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. महामार्गावरून जात असलेल्या एका धावत्या बसला अचानक भीषण आग लागली. आगीचे स्वरूप लक्षात येताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि प्रसंगावधान राखत प्रवाशांनी चालत्या बसमधून उड्या मारून आपले प्राण वाचवले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस अमरावतीकडून नागपूरच्या दिशेने जात असताना सावर्डी गावाजवळ अचानक बसमधून धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीच्या तीव्र लपोटा उठू लागल्या. आग लागल्याचे समजताच चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वेगाने पसरत असल्याने प्रवाशांनी घाबरून खिडक्या आणि दरवाजातून बाहेर उड्या मारण्यास सुरुवात केली.
या अपघातात बसचे प्रचंड नुकसान झाले असून आग एवढी भीषण होती की बस पूर्णपणे खाक झाली. परंतु, सुदैवाने सर्व प्रवाशांनी वेळेत बाहेर उड्या मारल्यामुळे या संपूर्ण घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही अथवा कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. आग नेमकी कशामुळे लागली, याचे अचूक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.