चांदीचा फुगा फुटला ! ऐतिहासिक उच्चांकाच्या तुलनेत चांदी तब्बल २.४३ लाखांनी स्वस्त; सोन्याच्या दरातही मोठी घसरण
मुंबई: लग्नसराईच्या तोंडावर सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण कायम असून, चांदीच्या किमतीत ऐतिहासिक घसरण पाहायला मिळत आहे. जानेवारी महिन्यातील विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत चांदीचे दर तब्बल २ लाख ४३ हजार ५०५ रुपयांनी खाली आले आहेत. चांदीपाठोपाठ सोन्याच्या दरातही मोठी घट झाल्याने खरेदीदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
चांदीच्या दरातील मोठी घसरण
वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीने प्रति किलो ४ लाख २० हजार ४८ रुपये असा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. मात्र, त्यानंतर चांदीच्या दरातील तेजीचा फुगा फुटला असून किमती सातत्याने घसरत आहेत. सध्या एमसीएक्सवर एक किलो चांदीचा दर १ लाख ७६ हजार ५४३ रुपयांच्या आसपास आला आहे. म्हणजेच सर्वोच्च पातळीवरून चांदी जवळपास २.४३ लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे.

सोन्याचे दरही उतरले
केवळ चांदीच नाही, तर सोन्याच्या किमतीतही मोठी घसरण नोंदवली गेली आहे. एका आठवड्यात वायदा बाजारात सोन्याचा दर ५,४०० रुपयांहून अधिक घसरला आहे. १ लाख ४२ हजार रुपयांच्या पुढे गेलेले १० ग्रॅम सोन्याचे दर आता घसरून १ लाख ३६ हजार रुपयांच्या पातळीवर आले आहेत.

दर घसरण्याची प्रमुख कारणे
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमेरिकन डॉलर मजबूत होणे आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीचे मिळणारे संकेत यामुळे मौल्यवान धातूंवर दबाव वाढला आहे. याशिवाय, मोठ्या गुंतवणूकदारांनी नफावसुलीसाठी (Profit Booking) विक्रीचा सपाटा लावल्याने आणि औद्योगिक मागणीत घट झाल्याने सोने-चांदीच्या दरात ही मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी
सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू होत आहे. अशा परिस्थितीत सोने आणि चांदीच्या दरात झालेली ही मोठी घसरण ग्राहकांसाठी दागिने खरेदी करण्याची उत्तम संधी मानली जात आहे. मात्र, स्थानिक कर (GST) आणि घडणावळीच्या शुल्कामुळे विविध शहरांतील सराफा बाजारात दरांमध्ये थोडा फरक असू शकतो. त्यामुळे खरेदीपूर्वी स्थानिक बाजारभावाची खात्री करून घ्यावी.