अमरावती -
शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजय गांधी नगर परिसरात एका २३ वर्षीय युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहित प्रभाकर गजघाटे (वय २३ वर्षे, रा. संजय गांधी नगर, क्र. १, अमरावती) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी कारवाई करत गुन्हे शाखेच्या (अपराध शाखा) पथकाने अवघ्या काही तासांतच हल्ला करणाऱ्या तिन्ही अल्पवयीन आरोपींना (विधि संघर्षग्रस्त बालक) ताब्यात घेतले आहे. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

घटनेचा सविस्तर तपशील :
१३ नोव्हेंबर २०२६ रोजी अमरावती शहर पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की, फ्रेजरपुरा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या संजय गांधी नगर परिसरात काही मुलांनी एका युवकावर चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे. माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली.

गुन्हे शाखेच्या पथकाने जखमी युवक रोहित गजघाटे याच्याकडून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या तिन्ही अल्पवयीन मुलांची ओळख पटवून त्यांचा शोध सुरू केला.
गुन्हे शाखेकडून आरोपींना अटक :
शोधमोहीम सुरू असतानाच, गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, तिन्ही संशयित आरोपी किशोर नगर परिसराच्या दिशेने फिरत आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ किशोर नगर परिसरात धाव घेतली. तिथे तीन संशयित मुले फिरताना आढळली. पोलिसांना खात्री पटताच त्यांनी सापळा रचून तिघांनाही घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले.

पोलीस खाक्या दाखवताच तिन्ही अल्पवयीन मुलांनी जुन्या वादातून रोहितवर चाकूने वार केल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेने पुढील कायदेशीर कारवाईसाठी तिन्ही आरोपींना फ्रेजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
पोलीस यंत्रणा :
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त परिमंडळ-०१ यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त परिमंडळ-०२ श्याम घुगे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय तथा अपराध) प्रांजली सोनवणे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (अपराध) निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर, पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ आडे, पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने, राहुल महाजन, सचिन माकोडे आणि इतर अंमलदारांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.