कुऱ्हा (प्रतिनिधी) -
येथील आयुष्मान आरोग्य मंदिर (प्राथमिक आरोग्य केंद्र) येथे खासदार बळवंत वानखडे यांनी आकस्मिक भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासह परिसरातील उपकेंद्रांच्या कामकाजाचा आणि एकूणच आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला.

तालुका काँग्रेस कमिटीने आरोग्य सुविधांबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याच्या अनुषंगाने खासदारांनी ही भेट देत आरोग्य विभागाच्या समस्या, रुग्णांना येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सोयीसुविधांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आणि वेळेवर उपचार मिळावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी तालुका व कुऱ्हा शहर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते