नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांच्याकडून प्रभाग क्र. १४ मध्ये दिवाळी भेट; मिठाई व फराळ वाटप, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांच्याकडून प्रभाग क्र. १४ मध्ये दिवाळी भेट; मिठाई व फराळ वाटप, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण


अमरावती/प्रतिनिधी - 
दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. हाच आनंद प्रभागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचावा या उदात्त हेतूने, प्रभाग क्र. १४ च्या लोकप्रिय नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांना 'दिवाळी भेट' म्हणून मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे प्रभागातील  नागरिकांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा खराखुरा आनंद ओसंडून वाहताना दिसला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सौ. प्रांजली गुल्हाने आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात प्रभाग क्र. १४ मध्ये प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभागातील गरीब, गरजू तसेच सर्वसामान्य कुटुंबांना सणाचा आनंद द्विगुणित करता यावा, यासाठी थेट घराघरांमध्ये जाऊन या दिवाळी भेटीचे अत्यंत आदरपूर्वक वाटप करण्यात आले.
घरोघरी पोहोचला दिवाळीचा गोडवा
नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांच्यावतिने राहुल गुल्हाने यांनी  स्वतः प्रभागातील विविध भागांचा दौरा करत नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेतली. केवळ फराळ वाटप न करता, त्यांनी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांशी संवाद साधून त्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. लोकप्रतिनिधी आपल्या दारात येऊन सणाची भेट देत असल्यामुळे प्रभागातील माता-भगिनींनी सौ. प्रांजली गुल्हाने यांना भरभरून आशीर्वाद दिले.
नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव
या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल बोलताना प्रभागातील नागरिकांनी सांगितले की, "सौ. प्रांजली गुल्हाने या केवळ निवडणुकीपुरत्या मर्यादित न राहता, सुख-दुःखात आणि प्रत्येक सणावाराला आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात. महागाईच्या काळात अशा प्रकारे मिठाई आणि दर्जेदार फराळाचे वाटप केल्यामुळे आमची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे."
जनतेचा आनंद हीच माझी दिवाळी: सौ. प्रांजली गुल्हाने
या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने म्हणाल्या, "प्रभाग क्र. १४ मधील संपूर्ण जनता हे माझे कुटुंब आहे. सणाचा आनंद सर्वांना सारखाच मिळाला पाहिजे. माझ्या प्रभागातील प्रत्येक घरात दिवा लागावा आणि सर्वांचे तोंड गोड व्हावे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. जनतेच्या चेहऱ्यावरील आनंद हीच माझ्यासाठी दिवाळीची सर्वात मोठी भेट आहे."
या फराळ व मिठाई वाटप कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुल्हाने मित्र परिवाराने परिश्रम घेतले. या उपक्रमाची सध्या संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा असून, नगरसेविका सौ. प्रांजली गुल्हाने यांच्या संवेदनशील कार्यपद्धतीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.