अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे एका १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारमध्ये बसवून तरुणीचा विनयभंग; अमरावतीच्या फ्रेजरपुरा परिसरातील धक्कादायक घटना, दोघांवर गुन्हा दाखल
अमरावती -
शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मार्डी रोड परिसरात एका १९ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोर्शी येथील दोन संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला आरोपींनी बळजबरीने कारमध्ये बसवले आणि तिचा विनयभंग केला. एवढेच नव्हे तर पीडितेला अश्लील व जातिवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे.
या घटनेनंतर पीडितेने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मोर्शी येथील दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.