मोर्शी (अमरावती)
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर रात्रीच्या वेळी झालेल्या पार्टीचा एक ड्रोन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या प्रकरणामुळे शहरात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता यावर मोर्शी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने यांनी आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.
नगराध्यक्षांचे स्पष्टीकरण नेमके काय?
व्हायरल व्हिडिओ आणि आरोपांवर बोलताना नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने यांनी सांगितले की, हा कार्यक्रम यापूर्वीच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांनाही निमंत्रण देण्यात आले होते. या पार्टीमागे कोणताही चुकीचा किंवा गैरहेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

चौकशीचे संकेत आणि ठाम भूमिका
पुढे बोलताना गुल्हाने यांनी प्रशासकीय शिस्तीबाबत आपली भूमिका ठामपणे मांडली. त्या म्हणाल्या की, "या कार्यक्रमादरम्यान जर कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले असेल, तर त्याची सखोल चौकशी केली जाईल. नगरपरिषदेत कोणत्याही चुकीच्या प्रकाराचे समर्थन केले जाणार नाही."

प्रकरणाची पार्श्वभूमी
शासकीय कार्यालय बंद असताना रात्रीच्या वेळी नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागाने 'ओली पार्टी' झाल्याचा दावा करणारा एक ड्रोन व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता. या प्रकारावर नागरिकांमधून संताप व्यक्त होत असतानाच नगराध्यक्षांनी चौकशीचे आश्वासन देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीतून काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.