नांदगाव खंडेश्वर -
समूह साधन केंद्र, नांदगाव खंडेश्वर अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रस्तरीय इंग्रजी वाचन व लेखन कौशल्यविकास 'स्पेलिंग बी' (Spelling Bee) स्पर्धा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा स्थानिक जि. प. प्राथमिक शाळा (मुले), नांदगाव खंडेश्वर येथे पार पडली.
विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची आवड निर्माण व्हावी, शब्दांचे अचूक उच्चार, स्पेलिंग व लेखन कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने केंद्रप्रमुख अनिल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे उद्घाटन व आयोजन करण्यात आले होते.
अशी झाली स्पर्धा :
स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्साह व आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. पहिल्या फेरीत ३० शब्दांची लेखी श्रुतलेखन (Dictation) परीक्षा घेण्यात आली, तर दुसऱ्या फेरीत तोंडी 'स्पेल-इट' (Spell-it Round) फेरी घेण्यात आली.

स्पर्धेचा निकाल व विजेते विद्यार्थी:
या स्पर्धेतून प्रत्येक गटातील प्रथम दोन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. विजेते गटनिहाय विद्यार्थी खालीलप्रमाणे:
या स्पर्धेतून प्रत्येक गटातील प्रथम दोन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. विजेते गटनिहाय विद्यार्थी खालीलप्रमाणे:
- प्राथमिक गट १ (इयत्ता १ ली व २ री):
१) ईशान चिरंजीव माहातो (जि.प. शाळा, नांदगाव मुली)
२) कु. गायत्री नितीन दुधे (जि.प. शाळा, नांदगाव मुले) - प्राथमिक गट २ (इयत्ता ३ री ते ५ वी):
१) कु. मंजिरी देवेंद्र बोके (जि.प. शाळा, नांदगाव मुली)
२) कु. तृप्ती सचिन मारबदे (जि.प. शाळा, पहूर) - उच्च प्राथमिक गट (इयत्ता ६ वी ते ८ वी):
१) कु. पूजा चंदन टेळे (जि.प. शाळा, पहूर)
२) विनीत जयेंद्र कोटांगडे (जि.प. शाळा, शिरपूर)
परीक्षक व उपस्थितांचे सहकार्य :
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विषय साधन व्यक्ती अर्चना जुमळे यांनी चोख जबाबदारी सांभाळली. तसेच विशेष शिक्षक नीलिमा रंगारी, विवेक मालगे, मनोहर चव्हाण, सचिन अवघड, प्रतिभा अडकणे, हर्षा फुटाणे, ज्योती मंडलवार, राजू कांबळे, प्रकाश गुल्हाने, अर्चना कापडे, नलू ससाणे, रेखा राठोड, बुशारा तबस्सुम, शाजिया फिरदौस, वहिदा बानो, अफशा सामरिन मिर्झा यांच्यासह केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेच्या अध्ययनाबाबत आत्मविश्वास निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. तालुकास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण विभागाकडून अभिनंदन करण्यात आले असून पुढील स्पर्धेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.